अमोघ दास यांना स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांच्याविषयीचं वक्तव्य भोवलं ; इस्कॉनने घातली महिन्याभराची बंदी

अमोघ लीला दास हे प्रसिद्ध असून त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे
अमोघ दास यांना स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांच्याविषयीचं वक्तव्य भोवलं ; इस्कॉनने घातली महिन्याभराची बंदी
Published on

इस्कॉन (The International Society for Krishna Consciousness) कडून अमोघ लीला दास यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. अमोघ लीला दास यांनी स्वामी निवेकानंद आणि राकृष्ण परमहंस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ४३ वर्षीय अमोघ लीला दास हे प्रेरक वक्ते असून त्यांचा समाजमाध्यमांवर मोठा चाहतावर्ग आहे.

अमोघ यांनी आपल्या चुकीची कबुली दिल्याचं सांगत इस्कॉनने प्रेस रिलीज जारी करत म्हटलं आहे. या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून ते महिनाभर सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. अमोघ लीला दास हे प्रसिद्ध असून त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अमोल हे इंजिनियर होते. अमेरिकास्थित कंपनीमध्ये त्यांनी काम केलं आहे. मात्र, अध्यात्माच्या शोधात त्यांनी आपलं जीवन कृष्णभक्तीत अर्पण केलं आहे. ते वयाच्या २८ व्या वर्षापासून इस्कॉनसोबत जोडले गेले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

अमोघ लीला दास यांननी स्वामी विवेकानंद यांच्या माशांच्या सेवनाव प्रश्नचिन्ह उपस्थित करत सद्गुणी मनुष्य प्राण्याला इजा पोहचवणारी कोणतीही गोष्ट कधीही खाणार नाही. "सद्गगुणी मनुष्य कधी मासे खाईल का? माशालाही वेदना होतात ना? मग पुण्यवान माणूस मासे खाईल का?" असं वक्तव्य केलं होतं. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यावर देखील टीका केली होती.

logo
marathi.freepressjournal.in