महागाई, बेरोजगारीवरुन अमोल कोल्हेंचा सरकारवर हल्लाबोल ; म्हणाले, "सरकारचं डोकं..."

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकारकडून विकास झाल्याचं आणि अर्थव्यवस्था मोठी झाल्याचं सांगितलं जातं. मात्र...
महागाई, बेरोजगारीवरुन अमोल कोल्हेंचा सरकारवर हल्लाबोल ; म्हणाले, "सरकारचं डोकं..."

काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. तसंच "सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?" असा संतप्त सवाल देखील केला. यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी अनेक मुद्यांना हात घातला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकारकडून विकास झाल्याचं आणि अर्थव्यवस्था मोठी झाल्याचं सांगितलं जातं. मात्र, दरडोई उत्पन्नात किती वाढ झाली यावर मात्र कोणीही बोलत नाही. असं म्हणत अमोल कोल्हे यांनी सरकारचे वाभाडे काढले.

कृषी क्षेत्राविषयी बोलताना त्यानी सरकार कृषी क्षेत्राचा विकास झाल्याचं सांगते, मात्र, किटक नाशके, खते यांच्या किंमतींच्या वाढीवर मौन बाळगते, असं ते म्हणाले. तसंच मोदी सरकारची कार्यपद्धती पाहून गांधीजींचे तीन माकडं आठवतात, असा टोला देखील कोल्हे यांनी लगावला.

सरकारची कार्यपद्धती पाहून महात्मा गांधींची तीन माकडे आठवतात. सरकारविरोधात काही ऐकू नका, निवडणुकांशिवाय काही पाहु नका, सरकार विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद करा. असा टोला कोल्हे यांनी लगावला. यावेळी बोलताना कोल्हे यांनी महागाई, बेरोजगारी, दरडोई उत्पन्न, यांच्यावर बोलत नाही. यांच्यावर विश्वास कसा ठेवावा. असं देखील कोल्हे म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर असल्याचं सांगितलं जातं. मात्र, याचं वेळी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशाचा क्रमांक १४१ व्या स्थानावर असतो. यावेळी देशाची संपत्ती काही चार पाच उद्योगपतींच्या हातात सामावली आहे का? असा सवाल उपस्थित होतो. असं कोल्हे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in