Amul Milk Rate ; अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरात वाढ

कंपनीच्या योजनेनुसार 17 ऑगस्टपासून दुधाचे नवे दर लागू केले जाणार आहेत. कंपनीने नमूद केलेल्या ठिकाणी हे नवे दर तातडीने लागू केले जातील
Amul Milk Rate ; अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरात वाढ

गेल्या काही महिन्यांपासून महागाईमुळे सर्वसामान्यांसमोर महिन्याचा खर्च ताळेबंद तयार करण्याचे मोठे आव्हान असताना आता पुन्हा एकदा आर्थिक गणिते बिघडण्याची शक्यता आहे. देशातील आघाडीची दूध उत्पादक कंपनी अमूल आणि मदर डेअरी यांनी दुधाच्या दरात वाढ केली आहे. हे नवे दर अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगालमध्ये लागू होतील, असे कंपनीने म्हटले आहे.

प्रतिलिटर 2 रुपयांनी दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिलिटर ३७ रुपये दर मिळण्याचा अंदाज आहे. हे वाढलेले दर उद्यापासून म्हणजेच १७ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. अमूल आणि मदर डेअरीने हे अधिकृतपणे सांगितले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता अर्धा लिटर अमूल गोल्डची नवीन किंमत रु. 31 आणि अमूल ताजाच्या अर्धा लिटरची किंमत रु. 25. याशिवाय अमूल शक्ती दुधाच्या प्रत्येक अर्ध्या लिटर पॅकेटसाठी 28 रुपये मोजावे लागतात.

कंपनीच्या योजनेनुसार 17 ऑगस्टपासून दुधाचे नवे दर लागू केले जाणार आहेत. कंपनीने नमूद केलेल्या ठिकाणी हे नवे दर तातडीने लागू केले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. उत्पादन आणि वितरण खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ झाल्याचे अमूलने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in