गरोदर तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; तिघांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा

पीडितेवर तिच्या चुलत भावाने बलात्कार केला होता. तरुणीने भीतीपोटी ही गोष्ट कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती
गरोदर तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; तिघांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा

उत्तर प्रदेशातील मैनपुरीत एका गरोदर तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यात पीडिता गंभीर होरपळली असून, सैफई रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. या प्रकरणी ३ आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेवर तिच्या चुलत भावाने बलात्कार केला होता. तरुणीने भीतीपोटी ही गोष्ट कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती; पण ती गर्भवती झाल्याचे कळताच दोन्ही कुटुंबांनी गर्भपात करुन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी आरोपीच्या कुटुंबीयांनी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

पीडितेच्या आईने ८ ऑक्टोबर रोजी पोलिसांना सांगितले की, तिच्या मुलीवर ३ महिन्यांपूर्वी पुतण्याने बलात्कार केला. त्यात ती गरोदर झाली. मुलीचे पोट दुखायला लागल्यानंतर तीन महिन्यांनी आम्हाला ही गोष्ट समजली. मुलीला विचारले असता तिने आपल्या चुलत भावानेच आपल्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी कुटुंबाची बेअब्रु होऊ नये म्हणून प्रकरण आपसात मिटवून मुलीचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. आरोपीच्या आईने मुलीच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर ते मुलीला लग्नाचे कारण देऊन घरातून घेऊन गेले व तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक्षक कमलेश दीक्षित यांनी सांगितले की, पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून पीडितेला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठवले. पीडितेचा चुलत भाऊ, त्याची बहिण व इतर एकावर अल्पवयीन मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in