नियंत्रणरेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळला; जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रणरेषेवर सुरक्षा दलांनी घुसखोरीचे दोन प्रयत्न उधळून लावले. त्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रणरेषेवर सुरक्षा दलांनी घुसखोरीचे दोन प्रयत्न उधळून लावले. त्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले.

तंगधरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला, तर माचल, कुपवाडामध्ये घुसखोरीविरोधात हाती घेण्यात आलेल्या मोहिमेच्या वेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यांच्याकडून दोन एके-४७ रायफली, एक पिस्तूल, चार हातबॉम्ब आणि अन्य सामग्री हस्तगत करण्यात आली. सदर दोन्ही ठिकाणी अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून बुधवारी दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरून पाळत ठेवण्यात आली, तेव्हा करनाह आणि कुमकाडी येथे घुसखोरीचे प्रयत्न होत असल्याचे आढळले. त्यानंतर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले.

logo
marathi.freepressjournal.in