भारतात ‘एम पॉक्स’ रुग्ण आढळला

भारतात धोकादायक विषाणू ‘एम पॉक्स’चा पहिला रुग्ण आढळला आहे. या संक्रमित रुग्णाने नुकतीच एम पॉक्स संक्रमित देशाचा प्रवास केला होता. त्याला विलगीकरण कक्षात ठेवले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
भारतात ‘एम पॉक्स’ रुग्ण आढळला
AP
Published on

नवी दिल्ली : भारतात धोकादायक विषाणू ‘एम पॉक्स’चा पहिला रुग्ण आढळला आहे. या संक्रमित रुग्णाने नुकतीच एम पॉक्स संक्रमित देशाचा प्रवास केला होता. त्याला विलगीकरण कक्षात ठेवले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, ‘एम पॉक्स’चा प्रादुर्भाव असलेल्या देशातून परतलेल्या व्यक्तीला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे या रुग्णात ‘आफ्रिकी क्लॅड-२’चा एम पॉक्सचा रुग्ण आढळला.

जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केली आहे. सध्या अनेक देशांमध्ये याची असंख्य प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात देखील अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून याबद्दल खबरदारी घेतली जात आहे. मात्र भारतात तशी परिस्थिती नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश केंद्रीय आरोग्य खात्याने सर्व राज्यांच्या आरोग्य खात्याला संदिग्ध एम पॉक्स रुग्णांची तपासणी करण्याचे व संशयित रुग्ण आढळल्यास विलगीकरणाचे आदेश दिले.

logo
marathi.freepressjournal.in