'चांद्रयान 3' लँडिंगपूर्वीच 'या' सरकारी कंपनीने केला अभूतपूर्व विक्रम

जर भारताचं 'चांद्रयान ३' चंद्रावर उतरण्यात यशस्वी पार पडलं, तर चक्क जगाच्या नकाशावर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा प्रभाव आणखी वाढणार आहे.
'चांद्रयान 3' लँडिंगपूर्वीच 'या' सरकारी कंपनीने केला अभूतपूर्व विक्रम

आज फक्त भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगभरात 'चांद्रयान 3' ची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी रशियाची चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर प्रथम लँड होण्याची मोहीम अयशस्वी झाली होती. आता सर्वांच्या नजरा फक्त 'चांद्रयान 3' वर लागल्या असून संपूर्ण जग यासाठी प्रार्थना देखील करत आहे.

आज 'चांद्रयान ३' च्या आधारे एका सरकारी कंपनीने इतिहास रचला आहे. ही सरकारी कंपनी दुसरी कोणी नसून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही आहे. शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला आहे. HAL ही भारतातीलच नाही तर जगातील सर्वात जुनी एरोस्पेस कंपन्यांपैकी एक मानली जाते. विशेष म्हणजे इस्रोला चंद्र मोहिमेत या कंपनीनं खूप मदत केली आहे. जर भारताचं 'चांद्रयान ३' चंद्रावर उतरण्यात यशस्वी पार पडलं, तर चक्क जगाच्या नकाशावर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा प्रभाव आणखी वाढणार आहे.

'चांद्रयान ३' मोहीम यशस्वी होण्यासाठी अनेक ठिकाणी पूजा केली जात असून आशीर्वादही घेतले जात आहेत. खरं तर 'चांद्रयान ३' मोहिमेच्या मागे इस्रोबरोबरच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे मोठे नाव आहे. याचं कारणामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार कंपनीचा शेअरचा आकडा ४०२४ रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी ३१ जुलै रोजी कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला होता. आता फक्त २५ दिवसांतच या कंपनीने आपलाच विक्रम मोडून काढला आहे.

logo
marathi.freepressjournal.in