बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंडशी अनंत अंबानीचा साखरपुडा आज पार पडला

राधिका खूप आधीपासून अंबानी कुटुंबियांच्या लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये दिसत आली आहे
बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंडशी अनंत अंबानीचा साखरपुडा आज पार पडला

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा म्हणजेच अनंत अंबानी याचा आज साखरपुडा पार पडला. अनंताच्या बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंड हिच्याशी आज पारंपारिक पद्धतीने रोका समारंभ करण्यात आला. रिलायन्स समूहाचे संचालक-कॉर्पोरेट अफेयर्स परिमल नाथवानी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका आणि अनंत अंबानी खूप दिवसांपासून मित्र आहेत. मुंबईत जन्मलेल्या राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबई कॅथेड्रल, जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूलमधून केले. राधिकाने न्यूयॉर्क विद्यापीठातून पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्समध्ये बीए केले आहे. राधिका खूप आधीपासून अंबानी कुटुंबियांच्या लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये दिसत आली आहे.राजस्थानमधील नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात हा साखरपुडा साजरा करण्यात आला. या प्रसंगी अंबानी आणि मर्चंट कुटुंबीय उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in