अंदमानमध्ये सक्रिय ज्वालामुखीचा उद्रेक

भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अंदमान-निकोबारमधील बॅरन बेटावर असून, त्याचा पुन्हा उद्रेक झाल्याची घटना घडली आहे. या बेटावर १३ आणि २० सप्टेंबर रोजी दोन हलके स्फोट झाले. या स्फोटांमुळे कोणतीही मोठी हानी झाली नसली, तरी या भागात ४.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला.
अंदमानमध्ये सक्रिय ज्वालामुखीचा उद्रेक
Photo : X (@Swati_Harry)
Published on

विजयपूरम : भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अंदमान-निकोबारमधील बॅरन बेटावर असून, त्याचा पुन्हा उद्रेक झाल्याची घटना घडली आहे. या बेटावर १३ आणि २० सप्टेंबर रोजी दोन हलके स्फोट झाले. या स्फोटांमुळे कोणतीही मोठी हानी झाली नसली, तरी या भागात ४.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. भारतीय नौदलाने या उद्रेकाचे व्हिडीओदेखील रेकॉर्ड केले आहेत.

बॅरन बेट हे अंदमान समुद्रात असलेले एक छोटेसे बेट आहे. हे बेट पूर्णपणे एका ज्वालामुखीने तयार झाले असून, येथे मानवी वस्ती नाही. हे बेट पोर्ट ब्लेअरपासून १४० किलोमीटर दूर आहे. हा ज्वालामुखी बंगालच्या उपसागरात इंडियन आणि बर्मा या टेक्टॉनिक प्लेट्सच्या टक्करमुळे तयार झाला आहे. समुद्राच्या पातळीपासून त्याची उंची ३५४ मीटर आहे. हे बेट भूवैज्ञानिकांसाठी संशोधनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

आठ दिवसांत दोन स्फोट

या ठिकाणी १३ सप्टेंबरला पहिला स्फोट झाला, ज्यातून धूर आणि राख बाहेर पडली. त्यानंतर २० सप्टेंबरला दुसरा स्फोट झाला. हे स्फोट 'स्ट्रॉम्बोलियन' प्रकारात मोडतात, जे सौम्य पण सतत होत असतात. भारतीय नौदलाने २० सप्टेंबरच्या स्फोटाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, ज्यात लाव्हाचा प्रवाह दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in