संतप्त महिलांनी पेटवलं मणिपूर घटनेतील मुख्य आरोपीचं घर ; म्हणाल्या, "भलेही आरोपी..."

मणिपूर पोलीसांनी या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे
संतप्त महिलांनी पेटवलं मणिपूर घटनेतील मुख्य आरोपीचं घर ; म्हणाल्या, "भलेही आरोपी..."

मणिपूर येथे मे महिन्यात दोन महिलांची नग्र धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाल्यानं सर्वत्र संतापाची लाट पसरली. सर्वोच्च न्यायाललायने स्वत: या घटनेची दखल घेत सरकारला फटकारलं. सरकार या प्रकरणात कारवाई करणार नसेल तर आम्हाला कारवाई करावी लागेल, असं सांगत कोर्टाने सरकारला खडसावलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणी भाष्य करत दोशींवर कडक करवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं.

पोलिसांनी या प्रकरणी काल सकाळी मुख्य आरोपीला अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना पकडण्यात आलंय. मुख्य आरोपीला पकडल्याची माहिती मिळताच संतप्त जामावाने या आरोपींचे घरच पेटवून दिलं. आरोपीच्या घराला आग लावून जमावाने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

व्हायरल व्हिडिओत पुरुषांचा जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढताना दिसत आहे. यात त्या महिला विव्हळत, गयावया करत सुटकेची विनंती करत आहेत. तर काही लोक या महिलांना शेतात ओढून नेत आहेत. याच ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. संसदेत देखील या घटनेचे पडसाद उमटले. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारला फटकारलं. केंद्र सरकारने मणिपूर सरकारला खडसावलं. यानंतर जागे होतं मणिपूर पोलीसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली. यातील हुउरेम हेरोदास हा या घटनेतील मुख्य आरोपी असून तोच या घटनेचा करताकरविता असल्याचं कळताच त्याच्या शेजाऱ्यांनी त्याच्या घराला आग लावली. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास शेजाऱ्या पाजाऱ्यांनी एकत्र येत हेरोदासचं घर पेटवून दिलं.

संतप्त महिलांनी पेटवलं घर

महत्वाचं म्हणजे हेरोदासच्या घराला महिलांनी आग लावली आहे. हेरोदास हा या घटनेचा करताकरविता असल्याचं समजताचं संतप्त महिलांनी एकत्र जमत त्याच्या घराची जाळपोळ करुन आपला संताप व्यक्त केला. यावेळी या महिलांनी संतप्त भावनाही व्यक्त केल्या. हेरोदासचं घर पेटवणाऱ्या महिला या मेतई समाजातील आहे. भलेही आरोपी आमच्या समाजाचा असेल पण अशा कृत्याचं समर्थन आम्ही कदापि करणार नाही, अशी भूमिका या महिलांनी यावेळी मांडली.

ही आहेत अटक केलेल्या आरोपींची नावे

केंद्र सरकारने फटकारल्यानंतर पोलीसांना खडबळून जाग आली आहे. त्यांनी गुरुवार (२० जुलै) रोजी या घटनेतील मुख्य आरोपी हेरोदास याला अटक केली. यानंतर पोलीसांनी युमलेमबम जीबान, खुनडोंगबम अरुन आणि निनगोमबम टोम्बा या आरोपींना देखील अटक केली. नोंगपोक येथील कमाई येथील हे रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in