रिलायन्स कम्युनिकेशन्स बँक फसवणूक प्रकरण : अनिल अंबानी समूहाची ३०३४ कोटींची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी समूहाची ३०३४ कोटी रुपयांची नवीन संपत्ती मंगळवारी जप्त केली.
रिलायन्स कम्युनिकेशन्स बँक फसवणूक प्रकरण : अनिल अंबानी समूहाची ३०३४ कोटींची मालमत्ता जप्त
रिलायन्स कम्युनिकेशन्स बँक फसवणूक प्रकरण : अनिल अंबानी समूहाची ३०३४ कोटींची मालमत्ता जप्त
Published on

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी समूहाची ३०३४ कोटी रुपयांची नवीन संपत्ती मंगळवारी जप्त केली. पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई केली. ही कारवाई रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित मालमत्तेवर केली.

खंडाळ्यातील फार्महाऊस
खंडाळ्यातील फार्महाऊस

या कारवाईत उद्योगपती अनिल अंबानी यांचा दक्षिण मुंबईतील फ्लॅट आणि त्यांचा मुलगा जय अंशुल अंबानी यांच्या नावावर असलेले खंडाळ्यातील फार्महाऊस जप्त करण्यात आले आहे.

 ‘उषा किरण’ इमारत
‘उषा किरण’ इमारत

अनिल अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील खंबाला हिल येथील ‘उषा किरण’ इमारतीमधील फ्लॅट, पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथील फार्महाऊस आणि अहमदाबादमधील साणंद येथील ‘मुद्रा फाऊंडेशन फॉर कम्युनिकेशन्स रिसर्च अँड एज्युकेशन’च्या (मायका) मालकीच्या जमिनीचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in