अनिल देशमुखांच्या निकटवर्तींनी चौकशी अधिकाऱ्यांचा माग काढला ;सीबीआयने केले आरोपपत्र दाखल

कागदपत्रे लीक करण्याच्या कटात त्यांची कथित भूमिका होती. तर सर्व आरोपींना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अनिल देशमुखांच्या निकटवर्तींनी चौकशी अधिकाऱ्यांचा माग काढला ;सीबीआयने केले आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : अनिल देशमुख यांच्या जवळच्या सहकाऱ्याने महाराष्ट्राच्या माजी मंत्र्याविरुद्ध लाचखोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांच्या ठिकाणाचा मागोवा घेण्याचा कथित प्रयत्न केला, असा आरोप केंद्रीय चौकशी यंत्रणेने (सीबीआय) केला आहे. त्यांच्या गोपनीय अहवाल फुटीच्या संबंधातील एका प्रकरणातील आरोपपत्रात हा दावा केला आहे.

लाचखोरीच्या विविध आरोपांना सामोरे जाणाऱ्या अनिल देशमुख यांना क्लीन चिट देणाऱ्या एजन्सीचा मसुदा अहवाल २९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसारमाध्यमांसमोर आला होता. यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि एजन्सीचे उप निरीक्षक अभिषेक तिवारी यांना अटक केली होती. तसेच वर्षाच्या अखेरीस दोघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. डागा यांनी देशमुख यांच्या प्रकरण आतील सीबीआयच्या चौकशी अधिकाऱ्यांचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देशमुख यांचे नातेवाईक विक्रांत देशमुख यांना ७ ऑगस्ट २०२१ ला दिले होते, असा आरोप सीबीआयने केला आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार विक्रांत देशमुख हे अनिल देशमुख यांच्या आर्थिक देवाणघेवाणीचे हिशेब शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली सांभाळत असत. विक्रांत देशमुख हे कागदपत्रे फुटीच्या कारस्थानातील एक भाग होते, असा आरोप सीबीआयने केला आहे. ८ जून २०२१ रोजी डागा यांनी ८ जून २०२१ रोजी, विक्रांत देशमुख यांना सीबीआय अधिकाऱ्यांची ठिकाणे मिळवण्याचे काम दिले आणि नंतर त्यांनी ते करण्यास सहमती दर्शवली, असे एजन्सीने सांगितले.

या संबंधातील पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे की, गोपनीय दस्तऐवज बेकायदा मिळवून तसेच तपास आणि पर्यवेक्षी अधिकाऱ्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करून सीबीआय तपासाला खीळ घालण्यासाठी विक्रांत देशमुख डागासोबतच्या कटाचा एक भाग होता, असे पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे.

मात्र, विक्रांत देशमुखच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला सांगितले की, आरोपपत्रात नमूद केलेल्या कथित गुन्ह्याशी त्याचा कोणताही संबंध नाही आणि त्याला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.

फुटलेला अहवाल सीबीआयने ६ एप्रिल २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या प्राथमिक चौकशीशी (पीई) संबंधित आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर न्यायालयाचा आदेश आला.

सीबीआयने या वर्षी ऑगस्टमध्ये विशेष न्यायालयासमोर या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यात अनिल देशमुख यांची मुलगी पूजा, सून राहत, विक्रांत देशमुख आणि सयाजीत वायाळ हे कटकारस्थानातील सहभागी आरोपी आहेत. कागदपत्रे लीक करण्याच्या कटात त्यांची कथित भूमिका होती. तर सर्व आरोपींना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in