अनिल लाहोटी यांची ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्ती; दूरसंचार उद्योग क्षेत्राकडून स्वागत

माजी रेल्वे बोर्ड प्रमुख अनिल कुमार लाहोटी यांची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे
अनिल लाहोटी यांची ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्ती; दूरसंचार उद्योग क्षेत्राकडून स्वागत

नवी दिल्ली : माजी रेल्वे बोर्ड प्रमुख अनिल कुमार लाहोटी यांची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी माजी अध्यक्ष पी. डी. वाघेला यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ‘ट्राय’मधील सर्वोच्च पद रिक्त झाले होते.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अनिल कुमार लाहोटी, माजी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे बोर्ड, रेल्वे मंत्रालय, यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. ट्रायचे अध्यक्षपद स्वीकारल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी असलेली ही नियुक्ती त्यांचे वय ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्याप्रमाणे असेल, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून अधिसूचनेत म्हटले आहे.

ट्रायच्या नवीन प्रमुखाच्या नियुक्तीचे स्वागत करत दूरसंचार उद्यागाने आशावाद व्यक्त केला की, भारताच्या गतिमान दूरसंचार क्षेत्राच्या वाढीचा आणि प्रगतीचा काळ असेल. आम्ही आशावादी आहोत की, भारताच्या गतिमान दूरसंचार क्षेत्राच्या वाढीला आणि प्रगतीला नवीन चालना मिळेल आणि त्यांच्या समृद्ध अनुभवातून आणि मार्गदर्शनाचा सखोल फायदा होईल, असे उद्योग संस्था सीओएआयचे महासंचालक एस. पी. कोचर म्हणाले. कोचर म्हणाले की, ‘ट्राय’चे अध्यक्ष अनिल लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास आम्ही तयार आहोत. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला सक्षम करणे आणि डिजिटल इंडिया करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य होईल.

logo
marathi.freepressjournal.in