पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे वडिल म्हणाले, "ती स्वत:..."

आता या १४ वर्षाच्या मुलाची आणि ५ वर्षाच्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी कोण घेणार? अशी खंत देखील अंजूच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे वडिल म्हणाले, "ती स्वत:..."

प्रियकरासाठी पाकिस्तानातून बेकायदेशिर रित्या भारतात आलेल्या सीमा हैदर प्रकारणानंतर आता भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजू नामक महिला सध्या चर्चेता विषय ठरत आहे. सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर अंजू ही तिचा मित्राला भेटण्यासाठी भारतातून पाकिस्तानातून गेली. अंजू काजदेशिर रित्यात व्हिसा घेऊन भारतात गेली. पण आता तिने तिथे धर्म बदलून तिच्या नसरुल्लाह या मित्राशी विवाह केला आहे. तसंच तिने तिचं नाव बदलून फातिमा ठेवलं आहे. अंजूच्या या कृत्याने तिच्या वडिलांना अतिव दु:ख झालं आहे.

मला कोणत्याही गोष्टीची माहिती नाही, ती आमच्यासाठी मेली आहे. तिच्याशी आता माझ काही देणं-घेणं नाही, तीला हव ते ती करु शकते. तिच्या पाकिस्तानात जाण्याचा प्रश्नावर तिचे वडील म्हणाले, तिचं काय चाललं होतं हे मला माहिती नाही कारण मी गेलं एक वर्ष तिच्याशी बोललो नाही. जी मुलांना सोडून गेली, तिच्याशी आमचं नातं संपलं आहे. मुलांना सोडून जाणाऱ्यांशी आमचा संबंध कसा असू शकतो? असं देखील ते म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी व्हिसाची मुदत संपली काय किंवा ती स्वत: संपली काय याच्याशी माझा काही देणं घेणं नाही. अंजूने दोन मुलांचही आयुष्य उद्ध्वस्त केलंय. आता या १४ वर्षाच्या मुलाची आणि ५ वर्षाच्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी कोण घेणार? अशी खंत देखील अंजूच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in