कर्नाटकला दुष्काळी मदत जाहीर करा! सुरजेवाला यांची केंद्राला विनंती : भाजप खासदारांच्या ‘मौना’वर सवाल

राज्य सरकारने केंद्राला दिलेल्या निवेदनात १८१७७.४४ कोटी रुपयांचा मदत निधी जारी करण्याची मागणी केली होती
कर्नाटकला दुष्काळी मदत जाहीर करा!
सुरजेवाला यांची केंद्राला विनंती : भाजप खासदारांच्या ‘मौना’वर सवाल

बंगळुरू : कर्नाटक राज्याला दुष्काळ निवारणासह केंद्राचे अनुदान तातडीने विनाविलंब जाहीर करावे, असे आवाहन केंद्र सरकारला काँग्रेसचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी बुधवारी केले. या संबंधात भाजप खासदारांच्या मौनावरही त्यांनी सवाल केला.

या संबंधातील एका निवेदनात ते म्हणाले की, राज्य सरकारने एकूण २३६ तालुक्यांपैकी २२३ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत आणि तज्ज्ञांच्या अभ्यास अहवालानुसार ४८.१९ लाख हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. लहान आणि अल्पभूधारक शेतकरी अत्यंत संकटात आहेत.

राज्य सरकारने केंद्राला दिलेल्या निवेदनात १८१७७.४४ कोटी रुपयांचा मदत निधी जारी करण्याची मागणी केली होती, ज्यामध्ये इनपुट अनुदानासाठी ४६६३.१२ कोटी रुपये, आपत्कालीन मदतीसाठी १२५७७.८६ कोटी आणि गुरांची डोकी वाचवण्यासाठी आणखी ३६३.६८ कोटी रुपये समाविष्ट आहेत. मात्र, केंद्र सरकार राज्याच्या निवेदनाला दुर्लक्षित करत आहे,' असा आरोप त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in