कुनो नॅशनल पार्कमधील आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू

यामुळे आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या चित्यांची संख्या 9 झाली असून या 9 पैकी 6 प्रौढ चित्ते आणि तीन शावक आहेत
कुनो नॅशनल पार्कमधील आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू
Published on

सरकारने चालू केलेल्या चित्ता संवर्धन प्रकल्पाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आज (२ ऑगस्ट) रोजी मध्यप्रदेशातील कुनो येथील नॅशनल पार्कमध्ये आणखी एका मादी नामिबियन चित्त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आता मृत्यूमुखी पडलेल्या चित्यांची संख्या 9 झाली असून या 9 पैकी 6 प्रौढ चित्ते आणि तीन शावक आहेत. मिळालेल्या रिपोर्टनुसार ज्या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. ती नामिबियातून आणलेल्या 'धत्री' या नावाने ओळखली जाणारी चित्ता टिब्लिसी होती. तिचा मृतदेह हा बुधवारी कुनो हद्दीबाहेर आढळून आला आहे. प्राप्त माहितीनुसार दोन दिवसांपासून ही मादी चित्ता तिच्या जागेपासून बेपत्ता होती. जुलै महिन्यात 3 दिवसांमध्ये 2 चित्ते मरण पावले होते.

11 आणि 14 जुलै रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये तेजस आणि सूरज हे नर चित्ते मरण पावले होते. या चित्त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या नामेबियातून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क येथे आण्यात आलं होतं. हे चित्ते मृतावस्थेत आढळून आले होते. त्या दोघांच्याही मानेवर आणि पाठीवर जखमा झाल्या होत्या. रेडिओ कॉलरमुळे दोघांनाही बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं.

18 मे रोजी सुप्रीम कोर्टाने केएनपी येथे चित्त्यांच्या मृत्यूबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती. तसंच सरकारने राज्याचे राजकारण बाजूला ठेवून या चित्त्यांना राजस्थानला हलवण्याचा विचार करावा असं आवाहन देखील न्यायालयाकडून केलं गेलें होतं.

logo
marathi.freepressjournal.in