उत्तर प्रदेशात आणखी एका गुंडाचा एन्काऊंटर

एसटीएफने विनोदकडून ३० बोअरची चायनीज पिस्तुल, ९ एमएमची स्टेनगन, जिवंत काडतुसे आणि स्विफ्ट कार जप्त केली
उत्तर प्रदेशात आणखी एका गुंडाचा एन्काऊंटर

लखनऊ : उत्तर प्रदेश एसटीएफने गोरखपूरचा मोस्ट वॉन्टेड विनोद उपाध्याय याचा शुक्रवारी पहाटे सुलतानपूर जिल्ह्यात एन्काऊंटर केला. एसटीएफने विनोदला पकडण्यासाठी सापळा रचला होता. पण, तो तोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याने पोलीस पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल एसटीएफनेही केलेल्या गोळीबारात उपाध्याय ठार झाला.

विनोद उपाध्यायवर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. गोरखपूर पोलिसांची गुन्हे शाखा गेल्या ७ महिन्यांपासून त्याचा शोध घेत होती. २००७ मध्ये विनोद उपाध्यायने गोरखपूरमधून बसपच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्याचा पराभव झाला होता. उत्तर प्रदेशचे पोलीसप्रमुख अमिताभ यश म्हणाले, ‘‘शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता सुलतानपूरमध्ये उपाधीक्षक दीपक सिंह यांच्या टीमसोबत उपाध्यायची चकमक झाली. देहात कोतवाली भागात झालेल्या या चकमकीत विनोद उपाध्याय गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात नेले. पण, तिथे त्याचे निधन झाले.’’

एसटीएफने विनोदकडून ३० बोअरची चायनीज पिस्तुल, ९ एमएमची स्टेनगन, जिवंत काडतुसे आणि स्विफ्ट कार जप्त केली आहे. योगी सरकारने ६८ वॉन्टेड माफियांची यादी जाहीर केली होती. त्यात विनोद उपाध्यायचे नाव पहिल्या दहात होते. खंडणी मागणे, जमीन हडप करणे, करारावर पैसे देणे, व्याज देणे हे विनोदचे मुख्य काम होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद उपाध्यायचे अलीकडे राजधानी लखनऊ, नोएडा, दिल्ली, प्रयागराज, झारखंडसह अनेक ठिकाणी बांधकाम क्षेत्रात काम सुरू केले होते. फरार असताना तो याच शहरांमध्ये लपून बसायचा आणि पोलिसांच्या भीतीने रात्री प्रवास करत असे. गुरुवारी रात्री उशिराही तो कारने प्रयागराजला जात होता. दरम्यान, एसटीएफला त्याचे लोकेशन मिळाले. एसटीएफने त्याला सुलतानगंजजवळ घेरले तेव्हा चकमक झाली.

logo
marathi.freepressjournal.in