दुसऱ्या निर्भयाने दिल्ली पुन्हा हादरली

पोलिसांनी या मुलीला रुग्णालयात भरती केले आहे. तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.
दुसऱ्या निर्भयाने दिल्ली पुन्हा हादरली

दिल्लीत ‘निर्भया’सारखे प्रकरण पुन्हा उघड झाले आहे. १२ वर्षांच्या मुलीवर चार जणांनी बलात्कार केला. त्यानंतर तिला काठीने मारहाण केली. ती मृत पावल्याचे समजून तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले. या घटनेमुळे दिल्ली पुन्हा हादरली आहे.

पोलिसांनी या मुलीला रुग्णालयात भरती केले आहे. तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, तीन जण फरार आहेत. सीलमपूर येथे १८ सप्टेंबरला ही घटना घडली आहे. २२ सप्टेंबरला या दुर्घटनेची माहिती पीडित मुलीच्या आई-वडिलांना मिळाली. त्यांनी तत्काळ दिल्ली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी रविवारी या घटनेची माहिती दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in