लीना मणिमेककलईने पोस्ट केला आणखी एक फोटो ? सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया

भाजपाचे नेते शहजाद पुनावाला यांनी ट्विट करून तिचा विरोध केला, त्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, हा रचनात्मक अधिव्यक्तीचा विषय नाही आहे, हा जाणून बुजून भावना भडकवण्याचा प्रकार आहे
लीना मणिमेककलईने पोस्ट केला आणखी एक फोटो ? सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया

काली या चित्रपटाच्या पोस्टरचा वाद पेटलेला असतानाच लीना मणिमेककलई ने अजून एक ट्विटरवर फोटो पोस्ट करून अजून एक वाद निर्माण केला आहे. तिने भगवान शिव व पार्वती सिगारेट पित असतानाचा फोटो ट्विट केला आहे. यामुळे तिच्या विरोधात बोलत अनेकांनी ट्विटचा पाऊस पाडला आहे. अनेक नेते देखील तिच्या विरोधात व्यक्त होताना दिसत आहेत.

काय आहे नवीन ट्विट ?

लीना मणिमेककलई ने काही दिवसांपूर्वी तिची स्वतःची निर्मिती असेलेल्या काली या चित्रपटाचा पोस्टर व्हायरल केला. या पोस्टरमध्ये काली माता सिगारेट पीत असताना व हातात LGBT चा झेंडा हातात दाखवला आहे. सर्व स्तरांमधून विरोध हो असताना अजून एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये भगवान शिव व माता पार्वती सिगारेट ओढत आहे असे दृश्य आहे. या गोष्टीचा विरोध करत भाजपाचे नेते शहजाद पुनावाला यांनी ट्विट करून तिचा विरोध केला, त्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, हा रचनात्मक अधिव्यक्तीचा विषय नाही आहे, हा जाणून बुजून भावना भडकवण्याचा प्रकार आहे.

कोण आहे लीना मणिमेककलई ?

लीना मणिमेककलई हि मुळात तामिळनाडू मधील एक चित्रपट निर्माती आहे. तिने अनेक तामिळ चित्रपटांची व माहितीपटांची निर्मिती केली आहे. तिचे ५ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ती सध्या टोरोंटोमध्ये राहत असून तिची स्वतःची निर्मिती कंपनी आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in