तृणमूलच्या आणखी एका नेत्याला संदेशखलीतून अटक

ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केल्यानंतर मैती याने जवळपास चार तास स्वत:ला या घरात कोंडून घेतले होते.
तृणमूलच्या आणखी एका नेत्याला संदेशखलीतून अटक
Published on

कोलकाता : ग्रामस्थांच्या जमिनी बळकावल्याच्या आरोपावरून पश्चिम बंगाल पोलिसांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसचे नेते अजित मैती यांना उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील तणावग्रस्त संदेशखली येथून अटक केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान शाहजान शेख याच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

अजित मैती हा तृणमूल काँग्रेसमधील बडे प्रस्थ असलेला शाहजहान शेख याचा जवळचा साथीदार आहे. मैती याला रविवारी सायंकाळी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या घरातून अटक करण्यात आली. ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केल्यानंतर मैती याने जवळपास चार तास स्वत:ला या घरात कोंडून घेतले होते. ग्रामस्थांकडून जमिनी बळकावल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही मैती याला बेरमादजूर परिसरातून अटक केली, असे पोलिसांनी सांगितले. जवळपास ७० तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी शेख याच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. शाहजहान हा जबरदस्तीने जमिनी बळकावत असल्याच्या आणि स्थानिक महिलांचा छळ करीत असल्याच्या प्रामुख्याने तक्रारी आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in