सोलार ग्लासच्या आयातीबाबत अँटी-डंपिंग चौकशी सुरू; चीन, व्हिएतनाममधून आयातीबाबत भारत सरकारचा निर्णय

डंपिंगमुळे देशांतर्गत कंपन्यांचे नुकसान झाले आहे असे सिद्ध झाल्यास डीजीटीआर आयातीवर अँटी-डंपिंग शुल्क लादण्याची शिफारस करेल.
सोलार ग्लासच्या आयातीबाबत अँटी-डंपिंग चौकशी सुरू; चीन, व्हिएतनाममधून आयातीबाबत भारत सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : देशांतर्गत कंपन्यांच्या तक्रारीनंतर भारताने चीन आणि व्हिएतनाममधून काही सोलार ग्लास आयातीची अँटी-डंपिंग चौकशी सुरू केली आहे. वाणिज्य मंत्रालयाची तपास शाखा डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज (डीजीटीआर) चीन आणि व्हिएतनाममधून बनवलेल्या ‘टेक्स्चर टेम्पर्ड कोटेड ॲण्ड अनकोटेड ग्लास’च्या कथित डंपिंगची चौकशी करत आहे.

हे उत्पादन बाजारात सोलार ग्लास किंवा सोलर फोटोव्होल्टेइक ग्लास अशा विविध नावांनी देखील ओळखले जाते. बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडने देशांतर्गत उद्योगाच्या वतीने चौकशीसाठी आणि आयातीवर योग्य अँटी-डंपिंग शुल्क लागू करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

देशांतर्गत उद्योगाद्वारे योग्यरित्या सिद्ध केलेल्या अर्जाच्या आधारावर आणि स्वतःचे समाधान केल्यावर अर्जदाराने डंपिंग आणि परिणामी देशांतर्गत उद्योगाचे होणारे नुकसान सिद्ध करण्यासाठी सादर केलेल्या प्रथमदर्शनी पुराव्याच्या आधारावर कथित अँटी-डंपिंग तपासणी सुरू करते, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

डंपिंगमुळे देशांतर्गत कंपन्यांचे नुकसान झाले आहे असे सिद्ध झाल्यास डीजीटीआर आयातीवर अँटी-डंपिंग शुल्क लादण्याची शिफारस करेल. शुल्क लावण्याचा अंतिम निर्णय वित्त मंत्रालय घेते. वरील दोन देशांतील निर्यातदारांकडून भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेत उत्पादन विकले जात असल्याचे पुरेसे पुरावे आहेत. स्वस्त आयातीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत उद्योगांचे नुकसान झाले आहे की नाही हे ठरवण्यासाठी देशांद्वारे अँटी-डंपिंग तपासणी केली जाते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in