'ओपनहायमर'मधील या 'सीन'वरुन अनुराग ठाकूर संतापले, सेन्सॉरला खडसावत म्हणाले...

हा सीन चित्रपटातून लवकरात लवकर हटवण्यासाठी अनुराग ठाकूर यांनी दबाव टाकल्याचं सांगितलं जात आहे
'ओपनहायमर'मधील या 'सीन'वरुन अनुराग ठाकूर संतापले, सेन्सॉरला खडसावत म्हणाले...

ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहीली जाते. भारतात देखील त्यांच्या चित्रपटांची क्रेझ आहे. त्याचा 'ओपनहायमर' चा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या आयुष्यावर या चित्रपटाची निर्मीती आहे. ओपनहायमर यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गीतेचा प्रंचड अभ्यास केला होता. यासाठी त्यांनी संस्कृत देखील शिकली होती.

'ओपनहायमर' या चित्रपटात देखील दोन ठिकाणी या गोष्टींचा उल्लेख आला आहे. मात्र, त्यातील एका ठिकाणी आलेला उल्लेख हा वादात सापडला आहे. चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारा सिलियन मर्फी आणि अभिनेत्री यांच्यात चित्रित झालेल्या सेक्स सीनदरम्यान सिलियन मर्फी म्हणजेच ओपनहायमर हे भगवद्गीतेचं वाचन करत असल्याचं दाखवलं आहे. या दृश्यावर बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला आहे.

या सीनवरुन काहींनी आपल्या सर्टिफिकेशन बोर्डावरही ताशेरे ओढले आहेत. सेन्सॉरने असे सीन पास कसे केले असा सवालही केला गेला आहे. आता केंद्र मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. सेन्सॉरकडून असा सीन दाखवण्यासाठी मंजूरी तरी कशी मिळाली असा सवा ल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार अनुराग ठाकूर यांनी याबाबत सीबीएफसीला चांगलंच खडसावलं आहे. तसंच हा सीन चित्रपटातून लवकरात लवकर हटवण्यासाठी अनुराग ठाकूर यांनी दबाव टाकल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच या सीनवर कात्री लागण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in