"आपको चोट तो नहीं लगी?" राहुल गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल

"आपको चोट तो नहीं लगी?" राहुल गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व बहाल केले गेले. यानंतर ते पहिल्यांदाच ते सभागृहात पोहचले. त्यांनी सभागृहात आक्रमकपणे भाषण करत भाजपला चांगलंच धारेवर धरलं. आता राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात राहुल गांधी हे एका स्कुटर चालकाला मदत करताना दिसून येत आहेत.

काँग्रेसने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत स्कूटर जमिनीवर पडलेली दिसत आहे. राहुल गांधी यांना हे दिसताच त्यांनी आपली गाडी थांबवली आणि ते त्या स्कुटर चालकाजवळ गेले. त्याला त्याची स्कुटर उचलण्यास मदत केली. यानंतर ते त्यांची विचासपूर करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका व्यक्तीने शुट केला आहे. काँग्रेसकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

काँग्रेसने हा व्हिडिओ ट्विट करताना त्यात "तुम्हाला काही लागलं नाही ना?" संसदेत जाताना राहुल गांधी यांना एक स्कुटर रस्त्यावर पडलेला दिसला. ते गाडी थांबवून त्याच्याजवळ गेले आणि त्याची विचारपूस केली. जननायक. असं ट्विट तो व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने केलं आहे. राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in