सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याबद्दल विविध स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन
सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहनPhoto : X
Published on

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याबद्दल विविध स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

या आंदोलनाला सिनेसृष्टीतूनही मोठा पाठिंबा मिळत असून ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी केंद्र सरकारला वांगचुक यांच्याशी शांततापूर्ण चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. भारताने आपल्या सर्वोत्तम विचारवंतांपैकी एकाचा असा बळी जाताना शांत बसून पाहू नये, असे त्यांनी समाजमाध्यमावर नमूद केले. तर '३ इडियट्स' चित्रपटातील अभिनेते ओमी वैद्य यांनीही वांगचुक यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. नासिरुद्दीन शहा व अरुंधती रॉय यांनीही वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही मंगळवारी या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. वांगचुक हे देशाची संपत्ती असून, त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, कारण लढण्याचे इतरही मार्ग आहेत, असे त्यांनी सांगितले.

तीन विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

‘नीट’ परीक्षा गैरव्यवहाराविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणादरम्यान तीन विद्यार्थी आंदोलकांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २८ जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनात अनेक विद्यार्थी केवळ पाणी आणि मिठावर उपोषण करत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in