अन्न प्रक्रिया उद्योगासाठी किसान संपदा योजनेअंतर्गत मागवले अर्ज

अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा (FTL), ऑपरेशन ग्रीन्स - दीर्घकालीन उपाययोजना (OG) यांचा समावेश आहे
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी किसान संपदा योजनेअंतर्गत मागवले अर्ज

भारत सरकारचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत अर्ज मागवले आहे (PMKSY) आहेत. त्यात शेतीमालावर प्रक्रिय करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठीची योजना (APC), अन्न प्रक्रिया आणि साठवण क्षमता तयार करणे / वाढवणे यासाठीची योजना (एकक योजना -CEFPPC), एकात्मिक शीत साखळी आणि मूल्य वर्धन पायाभूत सुविधा योजना (Cold Chain), अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा (FTL), ऑपरेशन ग्रीन्स - दीर्घकालीन उपाययोजना (OG) यांचा समावेश आहे.

अन्न प्रक्रियेसंबंधित उद्योग सुरू करू इच्छिणारे पात्र संभाव्य प्रवर्तक / गुंतवणूकदार / नव उद्योजक आपले ऑनलाइन अर्ज https://sampada-mofpi.gov.in या संकेतस्थळावरुन २७ जून रोजी सकाळी १० पासून भरु शकतील. हे अर्ज www.mofpi.gov.in या संकेतस्थळावर संबंधित उपयोजनेच्या दिनांक ८ जून रोजी जारी करण्यात आलेल्या सुधारित नियमावली अनुसार विहित नमुन्यात केलेले असावेत. ऑनलाइन अर्ज दिनांक १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सादर करता येतील.

बोली पूर्व बैठक ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता खोली क्रमांक १२०, पंचशील भवन, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली येथे होईल. उप योजनेअंतर्गत स्वारस्य पत्र प्रतिसादाअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांचे मूल्यमापन स्वतंत्रपणे केले जाईल आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या तसेच संबंधित उप योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार किमान पात्रता मूल्यांकन निकष पूर्ण करणाऱ्या अर्जांना गुणवत्तेनुसार मंजुरी देण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या एका आठवड्याच्या आत मूळ धनादेश मंत्रालयाकडे पोहोचेल असा पाठवावा.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in