आरती साठे यांची अखेर हायकोर्टात न्यायमूर्तीपदी नियुक्ती; अधिसूचना जारी

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी अधिवक्ता आरती अरुण साठे यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी केंद्र सरकारने बुधवारी त्यांच्यासह अन्य दोन न्यायमूर्तीच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली.
आरती साठे यांची अखेर हायकोर्टात न्यायमूर्तीपदी नियुक्ती; अधिसूचना जारी
Published on

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी अधिवक्ता आरती अरुण साठे यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी केंद्र सरकारने बुधवारी त्यांच्यासह अन्य दोन न्यायमूर्तीच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली. या नियुक्तीमुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची संख्या ६९ झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २८ जुलैला ॲड. साठे यांच्यासह ॲड. अजित कडेठाणकर आणि ॲड. सुशील घोडेस्वार यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) आमदार रोहित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी राज्य भाजपच्या माजी प्रवक्त्या असलेल्या आरती साठे यांच्या शिफारशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, तरीही केंद्र सरकारने साठे यांच्यासह तीन वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यास मंजुरी देणारी अधिसूचना जारी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in