मणिपूरमध्ये  शस्त्रास्त्र साठा जप्त

मणिपूरमध्ये शस्त्रास्त्र साठा जप्त

एका अन्य वेगळ्या कारवाईत, इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील केसमपत जंक्शन येथून तीन जणांना अटक करण्यात आली

इम्फाळ : चुराचंदपूर जिल्ह्यातील दोन गावांमध्ये शनिवारी मणिपूर पोलिसांनी घेतलेल्या शोधमोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी डी हाओलेनजांग गावाच्या बाहेरून चार बंदुका, एक सुधारित लांब पल्ल्याची हेवी मोर्टार आणि दारुगोळा जप्त केला, तसेच तेथून १२०० रुपयांच्या एकूण दर्शनी मूल्याच्या बनावट नोटाही जप्त केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दुसऱ्या शोधमोहिमेदरम्यान, पोलिसांच्या पथकाने चुरचंदपूरमधील मोलजंग गावातून १० बंदुका, आठ जिलेटिन कांड्या आणि दारुगोळा जप्त केला, असे पोलीस नियंत्रण कक्षाने म्हटले आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका अन्य वेगळ्या कारवाईत, इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील केसमपत जंक्शन येथून तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून दोन एसएलआर रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मणिपूर गेल्या वर्षी मे महिन्यापासून वांशिक हिंसाचाराने हादरले आहे आणि १८० हून अधिक लोक मारले गेले आहेत. मैतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ३ मे रोजी 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचाराचा भडका उडाला.

logo
marathi.freepressjournal.in