जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या बसचा मोठा अपघात

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. या अपघातात बसचा अक्षरश: चक्काचूर
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या बसचा मोठा अपघात

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या बसचा मोठा अपघात झाला आहे (ITBP Bus accident News). 37 ITBP जवान आणि दोन J&K पोलिस कर्मचारी घेऊन जाणारी बस पहलगाममध्ये नदीत पडली. बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, बस चंदनवाडीजवळ दरीत कोसळली. या भीषण अपघातात एकूण सहा जवान जखमी झाले आहेत. अनेक सैनिक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. या अपघातात बसचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यावरून हा अपघात किती भीषण होता, याची कल्पनाच धक्कादायक आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in