काश्मीरमध्ये लष्करातील कॅप्टन शहीद, एका दहशतवाद्याचाही खात्मा

जम्मू क्षेत्रात हिंसाचाराच्या उद्रेकात वाढ झाली असून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोडा जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत लष्करातील एक कॅप्टन शहीद झाला तर अन्य एक दहशतवादी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चकमकीत एक नागरिक जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
काश्मीरमध्ये लष्करातील कॅप्टन शहीद, एका दहशतवाद्याचाही खात्मा
Published on

जम्मू : जम्मू क्षेत्रात हिंसाचाराच्या उद्रेकात वाढ झाली असून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोडा जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत लष्करातील एक कॅप्टन शहीद झाला तर अन्य एक दहशतवादी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चकमकीत एक नागरिक जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

शिवगड-आसर पट्ट्यात परकीय दहशतवाद्यांचा एक गट दडून बसला असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने त्या परिसराला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली आहे. घनदाट जंगलात गोळीबार सुरू आहे. यावेळी झालेल्या चकमकीत लष्करातील कॅप्टन दीपक सिंह गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून सुरक्षा दलांना रक्ताने माखलेल्या चार बॅगा मिळाल्या, त्यामुळे चार दहशतवादी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांना प्रथम वाटले, मात्र चकमकीत एकच दहशतवादी ठार झाल्याचे नंतर अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्याकडून एक एके-४७ जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे एम-४ काबा इनही घटनास्थळी मिळाल्या. आसरमधील एका नदीजवळ हे दहशतवादी दडून बसले आहेत. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक आणि दहशतवाद्यांकडून एकमेकांवर गोळीबार केला जात असून, त्या स्थितीत संयुक्त पथके दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. शोधमोहीम सुरू असताना एक अधिकारी जखमी झाला. उधमपूर जिल्ह्यातील पटनीटॉप येथून दहशतवादी दोडा जिल्ह्यात घुसले, सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या ठावठिकाण्याचा अंदाज आला असून, त्या दृष्टीने शोध घेतला जात आहे. बुधवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू असून, दोन्ही बाजूंनी गोळीबारही केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in