दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे आमच्यासाठी सारखेच; लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा इशारा

दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे हे आमच्यासाठी एकच आहेत. दहशतवादाला आम्ही सडेतोड प्रत्युत्तर देत राहील, असा इशारा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी दिला.
दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे आमच्यासाठी सारखेच; लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा इशारा
दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे आमच्यासाठी सारखेच; लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा इशाराछायाचित्र : पीटीआय
Published on

नवी दिल्ली : दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे हे आमच्यासाठी एकच आहेत. दहशतवादाला आम्ही सडेतोड प्रत्युत्तर देत राहील, असा इशारा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी दिला.

एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, गेल्या एक वर्षात भारत आणि चीनच्या नेतृत्वामधील चर्चांमुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये सुधारणा झाली आहे.

पाकिस्तानकडून चालणाऱ्या घुसखोरी व दहशतवादाबाबत बोलताना जनरल द्विवेदी म्हणाले की, पाकिस्तानशी व्यवहार करताना भारत ‘न्यू नॉर्मल’ धोरण अवलंबत आहे. जर पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवादी संघटनांना पाठिंबा देत राहिला, तर ते त्याच्यासाठीच मोठे आव्हान ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. ‘भारत प्रगती आणि समृद्धीवर लक्ष केंद्रित करत आहे. त्याच्या मार्गात जर कोणी अडथळे निर्माण केले तर त्यांच्याविरुद्ध काही पावले उचलावी लागतील,’ असे ते म्हणाले.

‘आम्ही अनेकदा म्हटले आहे की, संवाद आणि दहशतवाद एकत्र राहू शकत नाहीत. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत. आम्ही शांततापूर्ण प्रक्रियेच्या बाजूने आहोत आणि त्यासाठी सहकार्य करू. तोपर्यंत, आम्ही दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांना समानच मानू,’ असे लष्करप्रमुख म्हणाले.

‘आज भारत कोणत्याही प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला घाबरत नाही,’ असे ते म्हणाले. ते पाकिस्तानच्या आण्विक धमक्यांचा संदर्भ देत असल्याचे दिसत होते.

‘दहशतवादाविरुद्धच्या आमच्या ‘नवीन सामान्य’ धोरणामुळे पाकिस्तानसमोर एक आव्हान उभे राहील,” असेही त्यांनी नमूद केले.

लष्करप्रमुखांनी सांगितले की, देशाच्या प्रतिबंधात्मक क्षमतेला बळकटी देण्यासाठी भारताचे राजकीय नेतृत्व कटिबद्ध आहे. आजच्या काळात आपली प्रतिबंधक क्षमता अत्यंत मजबूत आहे आणि ती प्रभावीपणे काम करत आहे,’ असे त्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्ये सुधारणा

जनरल द्विवेदी यांनी जम्मू-काश्मीरमधील स्थितीबाबत बोलताना सांगितले की, २०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर परिस्थितीत मोठी सुधारणा झाली आहे. त्या निर्णयानंतर राजकीय स्पष्टता निर्माण झाली. दहशतवादी घटनांमध्ये मोठी घट झाली आहे,’ असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in