लष्करप्रमुखांची सियाचीनला भेट ;सैनिकी सज्जतेची पाहणी

चीनने २०२० साली लडाखमध्ये घुसखोरी करून देप्सांग पठारावर सैन्य आणल्याने सियाचीनचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला आहे
लष्करप्रमुखांची सियाचीनला भेट ;सैनिकी सज्जतेची पाहणी

लेह : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरमधील सियाचीन हिमनदी परिसराला भेट देऊन तेथील सैनिकी सज्जतेची पाहणी केली.

जनरल पांडे यांनी मंगळवारी लडाखला भेट दिली होती. त्यानंतर बुधवारी त्यांनी सियाचीन बेस कँप आणि त्या परिसरातील चौक्यांना भट देऊन लष्करी सज्जतेचा आढावा घेतला. तेथे त्यांनी शहीद जवानांच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहिली. काराकोरम पर्वतरागांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे २० हजार फूट उंचीवर वसलेल्या सियाचीन हिमनदीच्या परिसरात भारतीय सैन्य अव्याहतपणे तैनात आहे. शून्याखाली ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाणारे तापमान आणि अन्य अडचणींचा सामना करत भारतीय जवान तेथे खडा पहारा देत असतात. ही जगातील सर्वांत उंच रणभूमी आहे. पाकिस्तानने या परिसरावर दावा केल्याने तो परिसर वादग्रस्त बनला आहे. चीनने २०२० साली लडाखमध्ये घुसखोरी करून देप्सांग पठारावर सैन्य आणल्याने सियाचीनचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने तेथे अधिक सजग पवित्रा घेतला आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in