लष्कराकडून सर्जिकल स्टाइकचा इन्कार

दैनिक जागरणने दिले होते पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ल्याचे वृत्त
लष्कराकडून सर्जिकल स्टाइकचा इन्कार

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये नुकतेच सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. दैनिक जागरण या हिंदी प्रसारमाध्यमाने यासंबंधी वृत्त दिले होते. त्यावर लष्कराने हा खुलासा केला आहे.

भारतीय लष्कराने २१ आणि २२ ऑगस्ट रोजी पाकव्याप्त काश्मीरच्या कोटली येथील नियाकाल सेक्टरमध्ये दोन ते अडीच किमी आत घुसून दहशतवाद्यांचे चार तळ (लाँचिंग पॅड्स) उद्ध्वस्त केल्याचे वृत्त दैनिक जागरणने दिले होते. त्याचा लष्कराने इन्कार केला आहे. असा प्रकारची कोणतेही सर्जिकल स्ट्राइक्स सेनादलांनी केले नव्हते. मात्र, पूंछ जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार मारले होते, असे लष्कराने स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in