राजस्थानमध्ये लष्कराचं MIG-21 विमान कोसळलं ; अपघातात विमानाचा चक्काचूर

हनुमानगडमधील बहलोल नगर गावात हा अपघात झाला. विमान कोसळत असताना पायलटने विमानातून उडी मारली. त्यामुळे
राजस्थानमध्ये लष्कराचं  MIG-21 विमान कोसळलं ; अपघातात विमानाचा चक्काचूर

राजस्थानमधील हनुमानगडमध्ये मिग 21 विमान कोसळले आहे. या अपघातात दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. तर एक जण जखमी झाला आहे. हनुमानगडमधील बहलोल नगर गावात हा अपघात झाला. विमान कोसळत असताना पायलटने विमानातून उडी मारली. त्यामुळे तो वाचला आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

आज पहाटे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हवाई दलाचे हे विमान सुरतगडला जात होते. विमानात बसल्याने अपघात होईल हे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने लगेच पॅराशूट करून विमानातून उडी मारली. त्यामुळे विमानाचे दोन्ही पायलट सुखरूप बचावले. त्यांना काहीही झाले नाही. मात्र, नंतर हे विमान हनुमागढ येथे कोसळले.

विमान पाहण्यासाठी या परिसरात प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत. विमान कोसळणार असल्याचे लक्षात आल्यानंतर वैमानिकाने विमान गावाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तरी अजून मृत्यूचा आकडा समोर आला नाही आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in