लष्करी अधिकाऱ्याची स्पाईसजेटच्या चार कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

येथील विमानतळावर जादा सामानाच्या पैशावरून झालेल्या वादातून लष्करी अधिकाऱ्याने स्पाईसजेट विमान कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच उघड झाली.
लष्करी अधिकाऱ्याची स्पाईसजेटच्या चार कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
Published on

श्रीनगर : येथील विमानतळावर जादा सामानाच्या पैशावरून झालेल्या वादातून लष्करी अधिकाऱ्याने स्पाईसजेट विमान कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच उघड झाली. यात एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याचे हाड तुटले असून दुसऱ्याचा जबडा तुटला. तिसऱ्या कर्मचाऱ्याच्या नाकातून रक्त आले तर चौथा कर्मचारी बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडलेल्या कर्मचाऱ्याला आरोपी लाथा मारत होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना २६ जुलै रोजी श्रीनगर विमानतळावर घडली. स्पाईसजेटचे विमान श्रीनगरहून दिल्लीला निघाले होते. आरोपी अधिकारी दोन बॅग घेऊन चालला होता. त्याचे वजन १६ किलो होते. वजनाच्या मर्यादेपेक्षा ते अधिक होते. त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त पैसे भरावे लागतील, असे स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांनी आरोपी अधिकाऱ्याला सांगितले. मात्र, त्याने अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर बोर्डिंग पास प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच तो एअरोब्रीजमध्ये घुसला. हे सुरक्षा शिष्टाचाराचे उल्लंघन होते. जेव्हा कर्मचाऱ्यानी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एक कर्मचारी जमिनीवर बेशुद्ध झाला. तरीही त्याला लाथा बुक्क्याने मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, आरोपी सैन्य अधिकाऱ्याला ‘विमान उड्डाण बंदी’ यादीत टाकण्यात आले आहे. लष्करानेही या प्रकरणाची दखल घेऊन आरोपीविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत.

आरोपी अधिकारी लेफ्टनंट कर्नल रितेश कुमार सिंह हे गुलमर्गच्या युद्ध शाळेत तैनात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in