ड्युटी संपवून जाताना मांजाने गळा कापला; सैन्यदलातील जवानाचा मृत्यू, हैदराबाद येथील धक्कादायक घटना

रविवारी हैदराबादमधील उस्मानिया रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह सैन्य दलाकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे.
ड्युटी संपवून जाताना मांजाने गळा कापला; सैन्यदलातील जवानाचा मृत्यू, हैदराबाद येथील धक्कादायक घटना
Published on

मकर संक्रांतीनिमित्ताने अनेकजण पतंग उडवतात. पतंग उडवताना काहींकडून चीनी मांजाचा वापर केला जातो. शासनाकडून चीनी मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात येते, तरीदेखील लोक नियम धाब्यावर बसवून हा मांजा वापरतात. यामुळे पशु-पक्षी आणि माणसांसोबत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशीच एक हृदयद्रावर घटना हैदराबादमध्ये घडली. हैदराबादमधील लंगर हाऊस उड़्डाणपुलावर झालेल्या दुर्घटनेत सैन्यदलातील एका जवानाला आपला जीव गमवावा लागला आहे.

विशाखापट्टनमचे रहिवासी असलेले के. कोटेश्वर रेड्डीर(28) हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते हैदराबाद येथील सैनिक रुग्णालयात वाहक म्हणून काम करत होते. शनिवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ते ड्यूटी संपवून दुचाकीने घरी जात होते. यावेळी लंगर हाऊस जवळ असलेल्या उड्डाण पुलावर आले असता अचानक त्यांच्या गळ्याभोवती चीनी मांजा फास आवळला गेला. त्यामुळे रेड्डी हे जमिनीवर कोसळले. मांजामुळे त्यांचा गळा कापलागेल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यानंतर रेड्डी यांना तात्काळ सैनिकी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्याने रेड्डी यांचा जीव वाचू शकला नाही.

रविवारी हैदराबादमधील उस्मानिया रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह सैन्य दलाकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, पतंगाच्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होतो. पक्षी, प्राणी, नागरिक, बालके, वयोवृद्ध, वाहनस्वार जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in