श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या उरी भागात नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय सुरक्षा जवानांनी रविवारी हाणून पाडला. भारतीय लष्कर आणि जम्मू पोलीस व गुप्तहेर संघटना यांनी २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान संयुक्तरित्या मोहिम राबवून हे काम तडीस नेले. लष्कराने एक्सवर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. त्यात मोहिमेदरम्यान सहा पिस्तुले, चार हातबॉम्ब जप्त करण्यात आले असून मोहिम अजूनही सुरुच आहे, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.