अरुणाचल प्रदेशात अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना अटक

अरुणाचल प्रदेशात अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना अटक

या माहितीच्या आधारे पोलिसांनी आसाममधील सोनितपूर जिल्ह्याच्या खोनामुख गावातून अफजल हुसेन नावाच्या २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे

इटानगर : अरुणाचल प्रदेश पोलिसांनी मंगळवारी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन व्यक्तींना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपये मूल्याचे हेरॉर्इन जप्त करण्यात आले. पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्या आधारे त्यांनी सैजोसाजवळील नीती दारलाँग गावातील एका घरावर छापा मारला. हे ठिकाण पक्के केसांग जिल्ह्यातील आहे. त्यांनी हा माल ३५ कुप्या व एका साबणाच्या डबीत लपवला होता. शिवाय १६४ रिकाम्या कुप्या देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या, अशी माहिती तासी दरांग या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या संबंधात ज्युमीर गांगकाक नावाच्या २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडूनच हा माल पकडण्यात आला आहे. त्याची चौकशी सुरू असताना गांगटाक याने हा माल शेजारच्या आसाममधील एका व्यक्तीकडून आणल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आसाममधील सोनितपूर जिल्ह्याच्या खोनामुख गावातून अफजल हुसेन नावाच्या २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून देखील १२.३७ ग्रॅम हेरॉर्इन जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. पक्के केसांग जिल्ह्यात प्रथमच अमली पदार्थ संबंधात अटक करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in