केजरीवाल आणि त्यांच्या कन्येला धमकी; सात कोटी रुपये खंडणीचीही केली मागणी

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांची मुलगी हर्षिता केजरीवाल यांना जिवे मारण्याची धमकी देत सात कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
केजरीवाल आणि त्यांच्या कन्येला धमकी; सात कोटी रुपये खंडणीचीही केली मागणी
केजरीवाल आणि त्यांच्या कन्येला धमकी; सात कोटी रुपये खंडणीचीही केली मागणी
Published on: 

मोहाली : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांची मुलगी हर्षिता केजरीवाल यांना जिवे मारण्याची धमकी देत सात कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा करीत खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार जरनैल सिंग यांच्या मोबाईलवर यासंदर्भातील धमकीचा संदेश आणि फोन आला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर मोहाली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तिलक नगरचे आमदार जरनैल सिंग यांनी मोहालीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी सिंग यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आणि व्हॉट्सॲप संदेश आला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)