केजरीवालांना हटविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. देशहितापुढे वैयक्तिक हित दुय्यम असते, पण तो वैयक्तिक निर्णय असतो. हे न्यायालय आहे.
केजरीवालांना हटविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय
Published on

नवी दिल्ली : आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करून घेण्यास गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. देशहितापुढे वैयक्तिक हित दुय्यम असते, पण तो वैयक्तिक निर्णय असतो. हे न्यायालय आहे.

आम्हाला कायद्यानुसारच काम करावे लागते. आम्ही या प्रकरणी निर्णय देऊ शकत नाही. हे प्रकरण राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या कक्षेत येते. त्यामुळे तुम्ही सक्षम प्राधिकरणासमोर जावे, असे प्रभारी मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्या. अरोरा यांच्या पीठाने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in