केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाने अटकेप्रकरणी २९ एप्रिलला ठेवली सुनावणी

केजरीवाल यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी आणि ‘ईडी’कडून सॉलिसिटर जनरलनी बाजू मांडली. सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले की, मी काही वस्तुस्थिती तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. त्यावर न्यायालयाने सांगितले की, आम्हाला नोटीस जारी करू द्यात.
केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाने अटकेप्रकरणी २९ एप्रिलला ठेवली सुनावणी
Published on

नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी सुप्रीम कोर्टात दिलासा मिळू शकला नाही. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात २९ एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाचे न्या. संजीव खन्ना व न्या. दीपंकर दत्ता यांनी जाहीर केले, तर दुसरीकडे राऊज ॲॅवेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

केजरीवाल यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी आणि ‘ईडी’कडून सॉलिसिटर जनरलनी बाजू मांडली. सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले की, मी काही वस्तुस्थिती तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. त्यावर न्यायालयाने सांगितले की, आम्हाला नोटीस जारी करू द्यात.

त्यावर सिंघवी म्हणाले की, सुनावणीची तारीख निश्चित करा. त्यावर कोर्ट म्हणाले की, आम्ही तुम्हाला जवळची तारीख देऊ शकतो. पण, तुम्ही दिलेली तारीख सांगणार नाही. त्यावर सिंघवी म्हणाले की, केजरीवाल यांनी प्रचार करू नये, यासाठीच त्यांना अटक करण्यात आली. त्यावर न्यायालयाने शेवटच्या आठवड्यात सुनावणी करणार असल्याचे सांगितले.

न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ

राऊज ॲॅवेन्यू न्यायालयाने सोमवारी केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ते २३ एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात राहतील. केजरीवाल यांना तिहार तुरुंगाच्या २ क्रमांकाच्या बराकीत ठेवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in