मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीए विभव कुमार बडतर्फ

दक्षता विभागाने केजरीवाल यांचे वैयक्तिक सचिव विभव कुमार यांची नियुक्ती अयोग्य असल्याचे सांगितले. कुमार यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ केले जात आहे. कारण विभव कुमार यांच्या नियुक्तीसाठी कोणतीही निर्धारित प्रक्रिया व नियमांचे प्रामाणिकपणे पालन केलेले नाही. त्यामुळे त्यांची नियुक्ती अवैध व अमान्य आहे, असे दक्षता विभागाचे विशेष सचिव वाय. व्ही. व्ही. जे. राजशेखर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीए विभव कुमार बडतर्फ

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश दिल्लीच्या दक्षता विभागाने जारी केले आहेत.

दक्षता विभागाने केजरीवाल यांचे वैयक्तिक सचिव विभव कुमार यांची नियुक्ती अयोग्य असल्याचे सांगितले. कुमार यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ केले जात आहे. कारण विभव कुमार यांच्या नियुक्तीसाठी कोणतीही निर्धारित प्रक्रिया व नियमांचे प्रामाणिकपणे पालन केलेले नाही. त्यामुळे त्यांची नियुक्ती अवैध व अमान्य आहे, असे दक्षता विभागाचे विशेष सचिव वाय. व्ही. व्ही. जे. राजशेखर यांनी सांगितले. कथित मद्य घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ‘ईडी’च्या पथकाने केजरीवाल यांचे वैयक्तिक सचिव विभव कुमार यांची चौकशी केली होती. त्यांचा जबाब पीएमएलए नियमांतर्गत दाखल केला आहे. विभव कुमार यांनी त्यांच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक ४ वेळा बदलला आहे, असे ईडीने आरोपपत्रात नमूद केले आहे. यापूर्वीही ईडीच्या पथकाने विभव कुमार यांच्या निवासस्थानी १६ तास छापेमारी केली होती.

बडतर्फीला आव्हान देणार - विभव कुमार

दक्षता विभागाने केलेल्या बडतर्फीच्या कारवाईविरोधात विभव कुमार यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे जाण्याचे ठरवले आहे. तसेच ‘आप’चे कायदा पथकही या निर्णयाला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.

logo
marathi.freepressjournal.in