होळीत सूर्य आग ओकणार; तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता

हवामानातील बदलामुळे होळी पौर्णिमेपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची दाट शक्यता
होळीत सूर्य आग ओकणार; तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता

नवी दिल्ली : हवामानातील बदलामुळे होळी पौर्णिमेपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची दाट शक्यता आहे, असे १९७० पासूनच्या तापमानाच्या माहितीच्या विश्लेषणावरून स्पष्ट होत आहे.

‘ग्लोबल वॉर्मिंग’चा कल या दृष्टिकोनातून अमेरिकास्थित ‘क्लायमेट सेंट्रल’ने याबाबत विश्लेषण केले. हवामान बदलामुळे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि बिहारमध्ये तापमान ५ टक्के इतके चढे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता या तीन राज्यांसह राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओदिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील तापमानही ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता विश्लेषणावरून स्पष्ट होत आहे.

देशात मार्च आणि एप्रिल महिने सर्वात जास्त उष्णतेचे असतील, असेही ‘क्लायमेट सेंट्रल’ने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in