तब्बल २५५ प्रतिष्ठितांचे न्यूजक्लीक विरोधात राष्ट्रपतींकडे साकडे

देशविरोधी शक्तींना रोखायला हवे की नको असा प्रश्न या पत्रात या प्रतिष्ठित नागरिकांनी विचारला आहे
तब्बल २५५ प्रतिष्ठितांचे न्यूजक्लीक विरोधात राष्ट्रपतींकडे साकडे

नवी दिल्ली: देशातील २५५ माजी न्यायाधीश, विविध क्षेत्रातील जाणकार, आणि प्रशासकीय उच्चाधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून न्यूजक्लीक पोर्टलवर निर्णायक कारवार्इ करण्याची विनंती केली आहे. न्यूजक्लीक पोर्टल भारतात चीनच्या धोरणांचा प्रचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

न्यूयॉर्क टार्इम्समध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून न्यूजक्लीक पोर्टल जगभरात चर्चेत आहे. कारण हे पोर्टल अमेरिकन अब्जाधिश नेव्हेली रॉय सिंघम कडून अर्थसहाय्य मिळत असलेल्या ग्लोबल नेटवर्कचा घटक आहे. नेव्हेली रॉय सिंघम हे चीनच्या सरकारी प्रसार माध्यमांसोबत खूप जवळून काम करणारे व्यक्ती आहेत. प्रतिष्ठितांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या चार पानी पत्रात म्हटले आहे की आपण फ्री प्रेसच्या नावाखाली अनेक शत्रूपक्षांना सर्व प्रकारचे फायदे देत असतो. त्यांना मिळणारे हे संरक्षण देशहितासाठी अत्यंत घातक आहे. तसेच यामुळे ज्यांना खरोखर फ्री प्रेस चे काम करतात त्यांची प्रतिमा या मुळे डागाळली जाते. तेव्हा आपण अशा देशविरोधी शक्तींना रोखायला हवे की नको असा प्रश्न या पत्रात या प्रतिष्ठित नागरिकांनी विचारला आहे.

logo
marathi.freepressjournal.in