सरकारी तेल कंपन्यांचा तोटा वाढता वाढत असून पहिल्या तिमाहीत तो १८,४८० कोटी रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले असतानही गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असतानाही किंमत वाढवली जात नसल्याने हा तोटा वाढत असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलिमय कॉर्पोरेशन लि.ने शेअर बाजाराला दिली आहे.
तीन सरकारी तेल कंपन्यांनी ज्या इंधनाची किरकोळ विक्री करताना त्यांनी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून दर स्थिर ठेवल्याने पेट्रोल, डिझेल आणि देशांतर्गत एलपीजीमधील नफ्यात घट झाल्याने तोटा वाढत आहे. स्वयंपाकाचा एलपीजी गॅसच्या दरातही वाढ झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरची वाढ ६ एप्रिल रोजी करण्यात आली होती. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या चार महिन्यांपासून वाढलेले नाहीत. त्याचवेळी, मे महिन्यात सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ८ रुपयांनी आणि डिझेलवर ६ रुपयांनी कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल ९.५ रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले.
एप्रिल-जून तिमाहीत एचपीसीएलचे १०,१९७ कोटींचे नुकसान
त्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात. कारण, देशातील सरकारी तेल कंपन्यांचे नुकसान होत आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ला आर्थिक वर्ष २०२२-२३च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) १०,१९६.९४ कोटींचा तोटा झाला आहे. कोणत्याही तिमाहीत कंपनीला झालेला हा सर्वाधिक तोटा आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला १,७९५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. जानेवारी-मार्च तिमाहीत हा आकडा १,९००.८० कोटी रुपये होता.
आयओसीएलला १,९९२.५३ कोटींचा तोटा
यापूर्वी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) ने एप्रिल-जूनमध्ये १,९९२.५३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला होता. जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत रु. ५,९४१.३७ कोटी आणि जानेवारी-मार्च तिमाहीत रु. ६,०२१.९ कोटी होता. अशा परिस्थितीत कंपन्या येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवू शकतात.
एप्रिल-जून तिमाहीत भारतातील कच्च्या तेलाची आयात सरासरी १०९ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल होती. त्यामुळे कंपन्यांचे नुकसान झाले. आयओसीएलने एप्रिल ते जून या तिमाहीत पेट्रोल आणि डिझेलची विक्री १० रुपये आणि १४ रुपये प्रति लिटर तोटा सोसून केली. परंतु गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरलचा दर १०० डॉलरच्या आत आहे.