असदुद्दीन ओवेसींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

गाव, चर्च जळत आहेत. पण पंतप्रधान त्या वाईट चित्रपटाबद्दल बोलत आहेत आणि त्याचा फायदा त्यांना कर्नाटक निवडणुकीत घ्यायचा आहे
असदुद्दीन ओवेसींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. बजरंग दल, जय बजरंगबलीपासून द केरळ स्टोरीपर्यंतचे मुद्दे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसापूर्वी कर्नाटकातील बेल्लारी येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना द केरळ स्टोरीचा उल्लेख केला आणि विरोधी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर आता एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी लक्ष वेधले आहे.

काय म्हणाले ओवेसी ?

 “कर्नाटकमध्ये निवडणुका नक्कीच आहेत. मात्र दहशतवाद्यांनी त्यांच्या पाच जवानांना ठार केले. मणिपूरही जळत आहे,” ओवेसी म्हणाले. “गाव, चर्च जळत आहेत. पण पंतप्रधान त्या वाईट चित्रपटाबद्दल बोलत आहेत आणि त्याचा फायदा त्यांना कर्नाटक निवडणुकीत घ्यायचा आहे. पंतप्रधान या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत आणि पाकिस्तान आपल्या सैनिकांना शहीद करत आहे," पुढे ते म्हणाले की , "हा एक बनावट चित्रपट आहे. आमचा बुरखा दाखवून पैसे कमवायचे आहेत. पंतप्रधान द्वेष पसरवत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी पातळी घसरली आहे. त्यांना आम्हाला कोणती शिक्षा द्यायची आहे? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चित्रपटाचा संदर्भ देत काँग्रेसवर समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘दहशतवादी प्रवृत्तींना’ पाठिंबा दिल्याचा आरोप केला. काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्यांशी राजकीय सौदेबाजी करत आहे. भाजप नेहमीच दहशतवादाविरोधात कठोर आहे. जेव्हा-जेव्हा दहशतवादाविरोधात कारवाई होते तेव्हा काँग्रेसच्या पोटात दुखते, असे पंतप्रधान म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in