Asaram Bapu : आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; आश्रमातील शिष्यावर बलात्काराचा होता आरोप

कथित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला (Asaram Bapu) गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Asaram Bapu : आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; आश्रमातील शिष्यावर बलात्काराचा होता आरोप

आज गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला (Asaram Bapu) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कालच न्यायालयाने आसाराम बापूवरील सर्व आरोप निश्चित केले होते. अहमदाबादमधील मोटेरा येथील आश्रमामधील एका शिष्यावर त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. ऑक्टोबर २०१३मध्ये याप्रकरणी आसाराम बापूसह ७ जणांविरोधात एफआयआर दाखल केली होती. काल न्यायालयाने आसाराम बापूवरील सर्व आरोप निश्चित करत त्याला दोषी ठरवले होते. तसेच, या प्रकरणातील ६ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

ऑक्टोबर २०१३मध्ये एका शिष्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसांकडे एफआयआर दाखल केली होती. तसेच, या पीडितेच्या बहिणीवर आसाराम बापूचा मुलगा साई नारायणने बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये आसाराम बापू व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि ध्रुवबेन,निर्मला,जस्सी आणि मीरा असे चार अनुयायी आरोपी होते. यावेळी आसारामला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आसारामला कलम ३४२, ३५७, ३७६, ३७७ अंतर्गत दोषी ठरवले होते. सध्या तो जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवास भोगत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in