अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर

विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत जे काही घडले, त्याने आम्हा सर्वांना हलवून सोडले. त्यातून माझी मुख्यमंत्रीपदाला चिकटून राहण्याची इच्छा असल्याचा संदेश गेला
अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यांनी गुरूवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या निर्णयाची घोषणा केली.

सोनियांसोबतच्या बैठकीत गेहलोत यांनी राजस्थानातील घटनाक्रमाविषयी माफीही मागितली. ते आपल्या माफीनाम्यात म्हणाले - 'मी काँग्रेस अध्यक्षांशी जवळपास दीड तास चर्चा केली. मी काँग्रेसचा सच्चा सैनिक आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत जे काही घडले, त्याने आम्हा सर्वांना हलवून सोडले. त्यातून माझी मुख्यमंत्रीपदाला चिकटून राहण्याची इच्छा असल्याचा संदेश गेला. त्यामुळे मी त्यांची माफी मागितली.'

गेहलोत म्हणाले की, 'पक्षश्रेष्ठी एका ओळीचा प्रस्ताव पारित करण्याचा आमच्याकडे नियम आहे. मुख्यमंत्रिपदी असतानाही मला याची अंमलबजावणी करता आली नाही. त्याचे शल्य मला राहील. या घटनेमुळे देशात अनेक प्रकारचे संदेश गेलेत.'

तत्पूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ते गुरूवारी दिल्ली स्थित काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आल्याचे व उद्या फॉर्म दाखल करणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in