पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अशोक स्तंभाचे अनावरण

नवीन संसदेच्या इमारतीचे बांधकाम हिवाळी अधिवेशनापर्यंत पूर्ण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अशोक स्तंभाचे अनावरण
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेच्या नवीन इमारतीवर बांधण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केले. यावेळी मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कामगारांशी संवादही साधला.

संसदेच्या नवीन इमारतीवर बांधण्यात आलेल्या अशोक स्तंभाची उंची ६.५ मीटर असून हे कांस्यपासून बनवलेले आहे. तसेच या स्तंभाचे वजन ९ हजार ५०० किलो आहे. नवीन संसदेच्या छतावर हे अशोक स्तंभ बांधण्यात आले आहे. नवीन संसदेच्या इमारतीचे बांधकाम हिवाळी अधिवेशनापर्यंत पूर्ण होणार आहे.

सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत संसदेच्या नवीन इमारतीसोबतच इंडिया गेटजवळ १० अजून इमारती बांधल्या जाणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in