

नवी दिल्ली : २० पेक्षा अधिक प्रकारच्या विमानांवर ३,५०० तासांहून अधिक उड्डाणाचा दांडगा अनुभव असलेले आणि एक कुशल लढाऊ वैमानिक असलेले एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवारी अधिकृतपणे भारतीय वायुसेनेच्या नवीन प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला.
नवीन पदभार स्वीकारण्यापूर्वी, रेस कोर्स वायुसेना स्थानकावर वायुदलाकडून मावळते एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांना सन्मानपूर्वक 'गार्ड ऑफ ऑनर' (संरक्षक सलामी) देण्यात आला, त्यानंतर त्यांनी एअर चीफ मार्शल दीक्षित यांच्याकडे पदाची सूत्रे सोपवली.