दिल्लीत भरले आशियातील शस्त्रांचे सर्वात मोठे प्रदर्शन

लष्करीदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने संरक्षण सामग्री बनवण्याच्या भारताच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने ह्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे
दिल्लीत भरले आशियातील शस्त्रांचे सर्वात मोठे प्रदर्शन

नवी दिल्ली : इस्त्राईल-हमास युद्धाबाबत बातम्यांमध्ये आयर्न डोमपासून भूमिगत तळांना उद्ध्वस्त करणाऱ्या अनेक आधुनिक शस्त्रांचा उल्लेख होत आहे. अशा सारख्या अनेक अत्याधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन दिल्ली येथील प्रगती मैदानात भरले आहे. या क्षेत्रातील जगातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी सैन्य आणि देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या यंत्रणांसाठी आवश्यक अशी उत्पादने या प्रदर्शनात मांडली आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रदर्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मिलिपोल इंडिया २०२३ मध्ये आधुनिक पिस्तूले, सब-मशीन गन, रायफल आणि स्नायपर रायफल्सचे उत्पादक सहभागी झाले आहेत.

लष्करीदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने संरक्षण सामग्री बनवण्याच्या भारताच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने ह्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण उत्पादने बनवणाऱ्या आघाडीच्या प्रगत तंत्रज्ञान वापरणाऱ्या ग्रुपपैकी एक असणाऱ्या इडीजीर्इने त्याच्या समुहातील कॅराकल या आधुनिक अग्निशस्त्र उत्पादक कंपनीने आपल्या अत्यंत विश्वासार्ह कार्यक्षमता असणाऱ्या कॉम्बॅट पिस्तूल, सब-मशीन गन, मिशन-प्रुव्हन रायफल्स आणि बिनचुक नेम साधणारी स्नायपर रायफल्स प्रदर्शनात मांडल्या आहेत. ही शस्त्रे हैदराबादमधील आयकॉम-कॅरॅकल द्वारे स्थानिक पातळीवर तयार केली जातील.

आयकॉम ही मेगा इंजिनिअरींग आणि इंफ्रास्ट्रक्चर लि. (एमइआयएल) या समूहाची एक कंपनी आहे. सीओएमएम संरक्षण आणि एरोस्पेस, ऊर्जा, रस्ते, तेल आणि वायू आणि दूरसंचार यासारख्या क्षेत्रात डिझाइनिंग, अभियांत्रिकी, उत्पादन यात अग्रणी आहे. आयकॉम २५ वर्षांहून अधिक काळ भारतीय संरक्षण उद्योगासाठी लागणाऱ्या क्षेपणास्त्रे आणि त्याच्या उपप्रणाली, दळणवळण आणि इडब्ल्यू, या क्षेत्रांमध्ये उत्पादने विकसित आणि उत्पादन करत आहे. कंपोझिट, ड्रोन आणि काउंटर-ड्रोन सिस्टम, रडार सिस्टम, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स, शेल्टर्स आणि कमांड कंट्रोल सेंटर, यूएव्ही आणि अँटेना अशा अनेक उपकरणांची निर्मिती येथे होते.

मिलीपॉल इंडिया २०२३ मधील कॅरॅकल चा सहभाग हा या वर्षाच्या सुरुवातीला क्षेपणास्त्रे, संचार आणि इडब्ल्यू प्रणाली, युएव्ही, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स आणि काउंटर-ड्रोन सिस्टीम्सच्या निर्मितीमध्ये भारताची अग्रेसर एमइआयएल समुहाच्या आयकॉम या कंपनीबरोबरच्या भागीदारी परवाना करारानुसार आहे. करारामध्ये युएइ मधून भारताला संरक्षण साधनांच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण (टीवोटी) समाविष्ट आहे. २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत नवी दिल्लीच्या प्रगती मैदान येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in